HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या रणवीर काटकर व अथर्व पाटील हे पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करतील. ओंकार चोपडे याची भोपाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मलखांब स्पर्धेसाठी, सौरीष साळुंखे याची काश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आईसस्टॉक स्पर्धेसाठी सौख्या पाटील हिची जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या अखिल भारतीय नेटबॉल स्पर्धेसाठी, तर अंकिता मुरगुडे हिची पश्चिम विभागीय भारत स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.

विद्यापीठ संघात झालेल्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील , क्रीडा संचालक इजाज गडकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना डी. वाय. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील व तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.