शरद इन्स्टिट्युटच्या सात संशोधन प्रकल्पांची निवड
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सात संशोधन प्रकाल्पांची ‘अविष्कार २०२४’ च्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पेठनाका येथील विभागीय स्तरावरील 'अविष्कार २०२४' स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातील पदवी व पदव्यत्तर महाविद्यालयातून २५० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते.
इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी श्रेणी अंतर्गत मेकॅनिकल विभागातील अथर्व जोशी, वैभव चौगुले, रोहन ठोमके, हर्षवर्धन कामत, हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी ‘मानवी पायाच्या खालच्या आणि वरच्या गुडघ्यांसाठी सक्रिय प्रोस्थेटिक घोटा’ हा संशोधन प्रकल्प प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच इलेकट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सुयश पांडे, ऋतुराज पाटिल, मोहक सिदगोड़ा, महेश अवल्क्की यांनी ‘गतिशीलता-माइंड्स: पाल्सी, अॅमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, कॉडा इक्विना रूग्णांसाठी एआय सशक्त स्टँडरसह संभाव्यता सोडवणे’ हा संशोधन प्रकल्प डॉ. सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला व्दितीय क्रमांक मिळाला.
मेडिसन अॅण्ड फार्मसी श्रेणी अंतर्गत अर्टिफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स विभागातील यशराज चौगुले, योगिराज भंडारे, निलेश एडके, पृथ्वीराज खेडकर यांनी ‘डॉक्टर असिस्टंट मशीन’ हा संशोधन प्रकल्प प्रा. पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला प्रथम क्रमांक मिळाला.
कृषी आणि पशुसंवर्धन श्रेणीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर विभागामधील अस्मिता रणखांबे, श्रेया पुजारी, श्रावणी तोडकर यांनी ‘कृषी कामगारांसाठी एक सुरक्षा नवकल्पना’ हा प्रकल्प डॉ. सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला तृतीय क्रमांक मिळाला.
कॉमर्स मॅनेजमेंट अॅण्ड लॉ श्रेणी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर मनिषा येणपे, इंद्रायणी पाटील, प्रतीक्षा माने, प्रियांका पाटील यांनी ‘व्हर्टीस्टोअर : IOT वापरून वेअरहाऊस कार्यक्षमतेसाठी अनुलंब कॅरोसेल प्रणाली’ हा प्रकल्प प्रा. धनश्री बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील ऋतुजा पाटील, आकांक्षा माने, मनाली कोथळे, सोनाली चौधरी यांनी ‘टिनीएमएल वापरून अंधांना मदत करण्यासाठी सुरक्षित मार्गदर्शक स्टिक’ हा प्रकल्प प्रा. वर्षा जुजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला तृतीय क्रमांक मिळाला.
ह्युमॅनीटी, लॅग्वेज व फाइनआर्ट श्रेणीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर विभागातील प्रशिस्ती करंदीकर, सोनिया नारायणकर, प्रसाद शिंदे, तेजस निर्मले, निखिल शेंडगे या विद्यार्थ्यांनी ‘वृद्धांसाठी सुरक्षा आणि स्वातंत्र्य सशक्त करणे’ हा प्रकल्प डॉ. सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला प्रथम क्रमांक मिळाला.
ह्या सातही संशोधन प्रकल्पांची यड्राव येथे शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ८ डिसेंबर रोजी होणा-या आंतर विद्यापीठीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यामध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात आविष्कार-महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरु केले आहे. यामध्ये शरद इंजिनिअरिंगचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी यश संपादन करीत आले आहेत.
अविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सचिन गुरव, प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यी, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.