शाहू कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान

शाहू कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार पुणे येथे व्हीएसआयच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शानदार सोहळ्यात प्रदान केला.  व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण झाले. कारखान्याच्यावतीने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

     यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकांम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले,राष्ट्रिय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील,व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील,आमदार जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते-पाटील , बाळासाहेब पाटील, बाळासाहेब थोरात,राजेश टोपे,खासदार विशाल पाटील,आमदार,विश्वजित कदम, बी. बी. ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. . 

   यावेळी संचालक युवराज पाटील,यशवंत उर्फ बॉबी माने,सचिन मगदूम,सुनिल मगदूम,संजय नरके,भाऊसाहेब कांबळे,रेखाताई पाटील,सुजाता तोरस्कर,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

  

 ऊस उत्पादन वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम यापुढेही राबवू- राजे समरजितसिंह घाटगे

  यावेळी प्रतिक्रिया देताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कामकाज करीत असताना सभासद शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे कारखान्याने राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कारांची परंपरा अखंडित राखली आहे. संशोधन केंद्रातील अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवून त्यांना आधुनिकीकरणाची कास धरावयास लावणे. तसेच ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण उपक्रम यापुढेही राबवू.