शरद नारकर यांना 'भारत गौरव सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२४' प्रदान

शरद नारकर यांना 'भारत गौरव सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२४' प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शरद नारकर जीवन रक्षक सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष यांना भारत गौरव सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२४ हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.

 सामाजिक व आपत्ती रेस्क्यू फोर्स टीमच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलेल्या कार्याबद्दल भारत गौरव सन्मान समारोह समिती दिल्ली, यांचे कडून हा पुरस्कार राजेंद्र पाटील कारगिल युद्ध भारतीय सेना, संजय पाटील

राज्य सचिव शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, माननीय संजय मालवेकर सेवानिवृत्त भारतीय सेना दल, डॉक्टर स्मिता गिरी या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रम कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन सभागृह, उद्यम नगर, कोल्हापूर येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन अनिल माळवी (सचिव ऑर्गनायझिंग कमिटी) यांनी उत्तम केले. यावेळी देशभक्ती गीतांचा सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास जीवन रक्षक रेस्क्यू फोर्स चे प्रमुख सुनील कांबळे, कृष्णा चोरटे व टीमचे जवान उपस्थित होते.