शाहू साखर कारखान्याचे मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पाचशे मल्लांचा सहभाग

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी( रविवारी ता.18) ज्युनिअर व सीनियर गटातील रोमहर्षक कुस्त्या झाल्या.85 किलो गटात प्रथमच 19 मल्लांची नोंदणी झाली. एकून उच्चांकी पाचशेहे मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कुस्ती शौकिनानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरु आहेत.कुस्ती हेच जीवन या फेसबुक पेजवरुन या कुस्ती स्पर्धेचे आॕनलाईन प्रक्षेपण करण्यात येत आहे.
आज विजयी झालेल्या मल्लांची वजन गटवाईज नावे अशी आहेत.
*जूनियर 52 किलो गट-*
निलेश डाफळे (पिंपळगाव ) वि. वि. पृथ्वीराज सावंत( इस्पुर्ली) विनायक तांबेकर (सोनगे) वि. वि. महेश मगदूम (पिंपळगाव खुर्द)
*जूनियर 56 किलो गट-*
प्रसिद्ध रानगे (पुलाची शिरोली) वि वी यश हवालदार (तळंदगे) ज्ञानश्री शिंदे बेलवळे वि वी ऋषिकेश चौधरी (यळगुळ)
*सीनियर गट 85 किलो*
प्रताप पाटील (बेलवडे बुद्रुक) वि.वि. प्रथमेश पोवार (हनबरवाडी) निखिल पोवार (सौंदलगा) वि वि.आदित्य दिवटे, (मुरगुड)
*सीनियर गट 74 किलो*
रोहित येरुडकर (पिंपळगाव बुद्रुक )वि.वि. आकाश काळे पाचगाव अतुल मगदूम (इस्पूर्ली) वि.वि. अभिषेक तिवले( कळंबा)
*सीनियर गट 60 किलो*
अतिश कोरे (खेबवडे) वि. वि. अर्जुन शेटगे (शेंडूर)
छायाचित्र- कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्या मार्फत सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या कुस्ती स्पर्धेतील क्षण
*सोमवारी अंतिम फेरीतील लढती*
सोमवारी (ता.१९)रोजी सकाळी साडेसात वाजता सर्व गटातील अंतिम फेरीतील लढतीं सुरू होतील. याचवेळी बक्षीस वितरण शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.