HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद पवार गटाच्या 'या ' आमदाराने केले सुरेश धस यांच्यावर आरोप, म्हणाले...

शरद पवार गटाच्या 'या ' आमदाराने केले सुरेश धस यांच्यावर आरोप, म्हणाले...

बीड: भाजपचे  आमदार सुरेश धस सध्या खूपच चर्चेत पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण धस यांनी चांगलंच  लावून धरलं आहे. विधानसभेमध्ये यावरून आवाज उठवला आणि धनंजय मुंडेंवरही आरोप केले. वाल्मिक कराडला आका म्हणत धस यांनी आरोप केले. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू असताना सुरेश धस यांच्यावर वसुलीचा केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

कोण केले आरोप? 

आमदार सुरेश धस यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. धस यांनी स्वतःच्या बंगल्यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीसाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी २ हजार रुपये देखील वर्गणी गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून आमदार धस यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांनी केली आहे.

29 डिसेंबर रोजी सुरेश धस यांनी आष्टी येथील आपल्या बंगल्यावर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी रोजगार सहाय्यक यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस येणे सर्वांना अनिवार्य करण्यात आले होते, तसेच या सर्व लोकांकडून मीटिंग आणि कार्यक्रमाचा खर्च म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपयांची वसुली केली गेली असल्याच तक्रारीत म्हटलंय.

सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करा 

याअगोदरही आमदार सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार देत राम खाडे यांनी याअगोदर देवस्थान जमीन घोटाळा, इनामी जमीन घोटाळा देखील काढला होता. त्यामुळे आता या प्रकरणाची देखील जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.