सरपंच खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अधिक तपासासाठी सीआयडीकडे सोपवणार

बीड : बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्यातून अखेर ताब्यात घेतले आहे. अधिक तपासासाठी दोघांनाही सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांनी यासंदर्भात माहिती दिली.
सुदर्शन घुले मुख्य आरोपी नाही : आ. सुरेश धस
दोघा मुख्य आरोपींना अटक झाली, असा प्रश्न विचारला असता, सुरेश धस म्हणाले, की अजून एक राहिला ना... कृष्णा आंधळे... आणि सुदर्शन घुले हा काही मु्ख्य आरोपी नाही, प्यादं आहे. मुख्य आरोपी पोलिसांनी शोधला पाहिजे. मुख्य आरोपी आका आहे. ज्यांचा उल्लेख मी आका करतो, तो संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. घुले-सांगळेला फक्त सांगितलं, जाओ ऐसा ऐसा करो. सुदर्शन घुले फक्त अंमलबजावणी करणारा आहे, असं सुरेश धस म्हणाले.
ज्याने आदेश दिला, खंडणीसाठी आवादा कंपनीच्या मुख्य साहेबाला उचलून आणा, तो या प्रकरणाचा मु्ख्य आरोपी आहे. दरम्यानच्या काळात आकाच्या आकांनी फोनाफोनी केली असेल, तर तेही येतील. आणखी एक आरोपी पण लवकरात लवकर अटक होईल. आज थोडा राग कमी होईल, असं सुरेश धस म्हणाले.