शरद पवार सोमवारपासून तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

शरद पवार सोमवारपासून तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर( प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोमवार २ ते ५ सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिले जात आहे. कागलच्या शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होत असून, त्यावेळी होणाऱ्या कागल येथील जाहीर सभेत त्यांचे भाषण होणार आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत.

 २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी आगमन होईल. येथे विश्रांती घेऊन ते सायंकाळी पावणेपाच वाजता बेळगाव येथे जाणार. दीपक दळवी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तर सायंकाळी सात वाजता अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी ते मराठा मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. रात्री साडेनऊं वाजता कोल्हापुरात आगमन व मुक्काम असेल. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ते केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देणार आहेत. दुपारी पावणे तीन वाजता त्यांच्या हस्ते ए. डी. शिंदे सभागृहाचे उद्घाटन होईल. सायंकाळी साडेचार वाजता कागल येथील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. तेथून परतल्यावर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम होतील.४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सव पवार यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. सायंकाळी चार वाजता ते शासकीय विश्रामधाम येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणारआहेत. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. पतगंराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. सोनहिरा साखर कारखाना, वांगी- कडेगाव (जि. सांगली) येथे हा कार्यक्रम होणार आहे. तेथून ते साताराकडे रवाना होणार आहेत.