युवासेनेच्या वतीने गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधी) :वाढत चाललेला पाऊस व पूर परिस्थिती पाहता अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री ची गरज असते, हीं भावना लक्षात घेऊन युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्या नियोजनातुन साधारण 75 छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथे संपन्न झाला. यावेळी युवासेना विस्तारक विशाल विचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुंरे, विशाल देवकुळे, मंजित माने, रीमा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा चिटणीस अमित बाबर, योगेंद्र माने, संतोष कांदेकर, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे,योगेश लोहार, राकेश चौगुले, अक्षय घाटगे,प्रथमेश देशिंगे, अभिषेक दाबाडे, रोहित वेढे, सानिका दामूगडे, राजेश्री मिणचेकर, शशिकांत बिडकर, आदी उपस्थित होते.