टोल माफीसाठी खा.महाडिक लोकांच्या बाजूने नाहीत - आ.सतेज पाटील

टोल माफीसाठी खा.महाडिक लोकांच्या बाजूने नाहीत - आ.सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधि) : टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत. हे त्यांनी सिद्ध केलय. अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे..मी टोल नाक्याची कागदपत्रे मागणी केली असून हा टोल नाका थर्ड पार्टी, कोणाकडे चालवायला आहे. हे देखील लवकरच सिद्ध होईल. असं सूचक विधानही त्यांनी केलंय. आमदार सतेज पाटील हे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज विविध विषयावर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी, राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या दुरावस्थाच्या मुद्द्यावरून टोल माफीसाठी आंदोलन केलं होतं. यावरून, खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर देत टोल माफीच्या आंदोलनावरून माझ्यावर टीका करणारे खासदार धनंजय महाडिक हे, लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नाहीत... हे त्यांनी सिद्ध केलय. अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. मी टोल नाक्याची कागदपत्रे मागणी केली असून हा टोल नाका थर्ड पार्टी, कोणाकडे चालवायला आहे. हे देखील लवकरच सिद्ध होईल. असं सूचक विधानही त्यांनी केलंय. 

 दरम्यान टोल माफी आंदोलन केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आमदार सतेज पाटील यांनी याबाबत ही तीव्र नाराजी व्यक्त केली. गुन्हेच दाखल करायचे होते तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करायला हवा होता. लोकांच्या हितासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल होणार हे सरकारचे धोरण दिसत आहे. अशी टीकाही त्यांनी केली. कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवलेल्या पूरस्थितीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, पूरस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान एक दिवसांचा दौरा करायला हवा होता. असंही त्यांनी सांगितलं.लोकसभा निवडणुकी वेळी सहा दिवस मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात होते.. मात्र आपतीच्या वेळी सांगली आणि कोल्हापूरकडे त्यांनी पाठ फिरवली हे दुर्देवी असल्याचही त्यांनी सांगितले. 14 दिवस झाले पाण्याची पातळी कमी होत नव्हती. त्यामुळ याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील.भविष्यात, पूरस्थितीच्या अनुषंगाने करावे लागणारे नियोजन याबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी. अशी मागणीही त्यांनी केली.

 मनोज जरांगे पाटील हे नऊ ऑगस्टला कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या राज्यभराच्या दौऱ्यावर बोलताना, आमदार सतेज पाटील यांनी, मराठा आरक्षणावर सरकारने भूमिका घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्या बरोबरच, सगे सोयरे याबाबत जीआर काढण्याचा शब्द राज्य सरकारने नवी मुंबई येथे दिला होता.. सरकार जर याचे क्रेडिट घ्यायला पुढे येत असेल, तर आरक्षणाचा प्रश्न देखील राज्य सरकारने मार्गी लावला पाहिजे. असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितल.

 बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी वर ही आमदार सतेज पाटील यांनी भाष्य करत हुकूमशाहीचं हे घोतक असल्याचं त्यांनी सांगितलं.विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न त्याचबरोबर विरोधकांना जेलमध्ये घालने.अशा हुकुमशाहीचाच हा स्फोट असल्याचं त्यांनी सांगितलं. तर कोल्हापुरातील सुमारे 15 लोक बांगलादेशात असुन, ते सध्या सुखरूप आहेत. मात्र त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आपण त्याची माहिती उघड करू शकत नसल्याचही त्यांनी सांगितलं. या सर्वांना राज्य सरकारने सुखरूपरीत्या परत आण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आपण देखील पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितल.