सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक देशात एक नंबर करणाऱ्या हसन मुश्रीफांना निवडून द्या - उदयबाबा घोरपडे

सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक देशात एक नंबर करणाऱ्या हसन मुश्रीफांना निवडून द्या - उदयबाबा घोरपडे

मांगनूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे या महान मराठा योद्ध्यांचे स्मारक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभे करून त्यांचा इतिहासच तरुणाई समोर ठेवला आहे. जे काम कोणत्या राष्ट्रीय नेत्यालासुद्धा जमले नाही, ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी करून दाखवले आहे. हे त्यांचे कार्य इतिहासाच्या पानावर सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्याजोगे आहे, असे गौरवोद्गार पंचायत समितीचे माजी उपसभापती व सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज उदयबाबा घोरपडे यांनी काढले. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक देशात एक नंबर करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

           

मांगनूर ता. कागल येथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुक प्रचारार्थ आयोजित सभेत उदयबाबा घोरपडे बोलत होते. यावेळी मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीशसिंह घाटगे, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, माजी सरपंच आप्पासाहेब तांबेकर, शामराव पाटील, धनाजी तोरस्कर, चंदाराणी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  

           

 उदयबाबा घोरपडे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे  खणखणीत नाणं असून ते पुढे चालणारच आहे. मंत्री मुश्रीफ यांचे कार्य हे ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत जाऊ जाऊन पोहोचले आहे. त्यांच्याइतके प्रचंड काम करणारे नेतृत्व राज्यात शोधूनही सापडणार नाही. स्व. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर मंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे एकमेव नेतृत्व आम्हाला लाभले. त्यामुळे आता इकडे तिकडे बघू नका, विकासाच्या बाबतीत ते कधीही कमी पडणार नाहीत. याची मी खात्री देतो. 

            

        

सरसेनापतींचा जाज्वल्य इतिहास......!

महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे हे हिंदवी स्वराज्याचे सेनापती होते. त्यांचा जाज्वल्य इतिहास इतिहासकारांनी थोडासा लपवला होता. मात्र; मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्यामुळे हा इतिहास केवळ कोल्हापूर जिल्ह्यात, राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर पोचवण्याचं काम केले आहे. याचा आम्हाला त्यांचे वंशज म्हणून सार्थ अभिमान आहे. म्हणूनच त्यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून द्यावे, अशी सादही उदयबाबा घोरपडे यांनी घातली आहे. 

                  

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या भागाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. चिकोत्राच्या पाण्यापासून हा परिसर थोडासा वंचित होता. मात्र आता नागनवाडी प्रकल्प झाल्याने मांगनूरसह हसूर खुर्द, हसुर बुद्रुक, कासारीपर्यंत या पाण्याचा उपयोग होणार असल्याने वंचित गावेही सुजलाम झाली आहेत. 

        

मांगनूर येथे सरपंच विनायक मुधाळे,अशोक दाभोळे, रमेश जाधव, सचिन तांबेकर, भगवान गोरे, शारूबाई राऊत, बाजीराव पाटील, शिवाजी भांदिगरे, संजू जाधव, पंडीत चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संग्राम तोरस्कर यांनी केले. आभार सातापा पाटील यांनी मानले.