HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रक्तदानामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते : राजकुमार पाटील

रक्तदानामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते : राजकुमार पाटील

सांगली : रक्तदान करण्यासाठी समाजातील युवकांनी पुढे आले पाहिजे . रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे .यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल,असे प्रतिपादन सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केले. कासेगाव तालुका वाळवा येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज येथे  राजारामबापू पाटील स्मृती पंधरवडा व केमिस्ट्र व ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न झाले . यावेळी ते बोलत होते अध्यक्ष स्थानी आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य बी. के. माने होते.



या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजकुमार पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. राजाराम बापू ब्लड बॅकेच्या सौजन्याने हे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी राजकुमार पाटील म्हणाले, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉलेजची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या कॉलेजच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

यावेळी प्राचार्य बी.के.माने म्हणाले, रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात विद्यार्थ्यांनी यामध्ये उस्फूर्त सहभागी झाले पाहिजे. यावेळी फार्मसी  कॉलेजचे प्राचार्य श्रीनिवास मोहिते यांनी स्वागत केले. डॉ. प्रा. पंकज कोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अवनी शेवाळे यांनी आभार मानले. 

यावेळी डॉ.गणेश वाडकर, प्रा. हेमंत कंदले, शैलजा  कांबळे, संजय गुरव, अभिमन्यु जाधव, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.