संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदचे आयोजन

हातकणंगले (प्रतिनिधी)  : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या  मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार,  दुपारी ३.०० वाजता संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘सी ब्लॉक’ सेमिनार हॉल मध्ये करण्यात आलेले आहे. अशी माहिती प्रसार माध्यमास प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी दिली आहे.

डॉ. सुहास देशमुख हे संशोधन आणि व्यावहारिक प्रकल्पांद्वारे शिक्षण, आजपर्यंत त्यांच्या गटाने मशीन हेल्थ मॉनिटरिंगसाठी इन-सर्व्हिस इन्फॉर्मेशन सिस्टम, सेन्सर-लेस प्रिसिजन स्कॅनिंग मशीन, चुंबकीय इंधन कंडिशनर्स, लिनियर कंप्रेसर, मायक्रो-स्टिरिओलिथोग्राफी यासारखे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. डिझाईन, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन आणि एनर्जी ऑडिटिंग आणि विश्लेषण सल्लागार म्हणून डिझाईन सेंटर, इमर्सन टेक्नॉलॉजीज, पुणे, ॲमेझॉन इंडिया मार्गदर्शक म्हणून कामे केले आहे.

नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग स्थापना भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने नियामक संस्था, गुणवत्ता आणि परिणाम सुधारण्यासाठी व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेसाठी मानके निश्चित करण्यासाठी आणि सर्वसमावेशक नियम तयार करण्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय नियामक संस्था  म्हणून कार्य करते. दीर्घ आणि अल्प-मुदतीचे व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन्हीमध्ये गुंतलेल्या व्यावसायिक शिक्षण संस्थांचा विकास, गुणात्मक सुधारणा आणि नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,  व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य मूल्य शृंखलामध्ये गुणवत्ता हमी प्रदान करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे उत्तम रोजगार आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसाठी उच्च-स्तरीय कुशल मनुष्यबळाची उपलब्धता होते. विद्यार्थ्यांचा कौशल विकास करून सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या मार्गदर्शन कार्यक्रम  विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमास सहभाग नोंदवावा.  असे आवाहन कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. अजय बी. कोंगे यांनी केले आहे.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमचे आयोजन केल्याबद्दल, संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष,  संजयजी घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.