शिरोली एमआयडीसीमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून

शिरोली एमआयडीसीमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून

हातकणंगले प्रतिनिधि: हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी येथे शनिवार, उशिरा रात्री संदीप खामवव (वय 21) याचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली. ही घटना प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या संघर्षामुळे घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, या घटनेच्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.