शिवसेनाचा (उबाठा)58 वा वर्धापन दिन कोल्हापूर युवासेनेच्या वतीने साजरा

शिवसेनाचा (उबाठा)58 वा वर्धापन दिन कोल्हापूर युवासेनेच्या वतीने साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा 58 वर्धापन दिन कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीटभट्टी कामगार यांच्या अत्यंत गरीब मुलांना विविध खाऊ आणि गिफ्ट्स देऊन तावडे हॉटेल येथील वीटभट्ट्या परिसरात साजरा केला. याप्रसंगी सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर युवा अधिकारी संतोष कांदेकर, योगेंद्र माने, शहर समन्व्यक बंडा लोंढे, चैतन्य देशपांडे, शहर चिटणीस प्रथमेश देशिंगे, अक्षय घाटगे, उपशहर युवा अधिकारी अभिषेक दाबाडे,लतीफ शेख, युवसैनिक वैभव पाटील, विराज जांभळे, गणेश सुतार उपस्थित होते.