HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच, अखेर कोल्हापूर उत्तरच्या जागेवर शिवसेनेचा भगवा

शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच, अखेर कोल्हापूर उत्तरच्या जागेवर शिवसेनेचा भगवा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील रस्सीखेच अखेर संपली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवारी मिळाली असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. क्षीरसागर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात आणि यापूर्वी २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला होता.

भाजप-शिवसेना वादामुळे उमेदवारी लटकली

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये गेले काही दिवस वाद सुरू होता. दोन्ही पक्षांनी आपापले इच्छुक उमेदवार घेऊन मुंबईत तळ ठोकला होता. शिवसेनेने या मतदारसंघात सातत्याने यश मिळवले असल्याने आपला दावा कायम ठेवला होता. दुसरीकडे, भाजपने देखील आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखेर हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागला.

राजेश क्षीरसागर पुन्हा मैदानात

राजेश क्षीरसागर यांनी याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपयश पाहिले होते, परंतु त्यांनी त्यानंतरही लोकसंपर्क कायम ठेवत कामगिरी सुरू ठेवली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोल्हापूरसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, यंदाच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर प्रबळ दावेदार ठरले आहेत.

शिवसेनेला मिळालेले यश आणि भविष्यातील लढत

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील या निर्णयामुळे शिवसेनेचा गड पुन्हा एकदा मजबूत झाला आहे. क्षीरसागर यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळवून देण्याचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्यांची सध्या जोरदार तयारी सुरू असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजप आणि इतर प्रतिस्पर्ध्यांसमोर कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.