उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा-समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) : कागल विधानसभा मतदार संघातील जनतेने या निवडणुकीत परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या मुहूर्तावर (ता.24 दाखल करीत आहोत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कागल,गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बेलवळे खुर्द ता. कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ समर्थक दिनकर कोतेकर यांच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत व संपर्क दौरा अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी मुश्रीफ गटाचे प्रमुख कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे,सातापा कांबळे,महाजी कांबळे,शहाजी कांबळे,दिगंबर कांबळे,युवराज कांबळे,अशोक कांबळे, विनायक कांबळे, उमेश कांबळे, आदित्य कांबळे,तानाजी कांबळे, अमर कांबळे, अरुण कांबळे, राजेश कांबळे,सुमित कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ समर्थक कोतेकर यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीस कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला व विधानसभेच्या निवडणुकीसाठी घाटगे यांना पाठींबा जाहीर केला.त्यांचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी स्वागत केले.
घाटगे पुढे म्हणाले, कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात कुटुंबातील सदस्य म्हणून सहभागी झालो.त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहून काम केले.त्यासाठी कोणत्याही कार्यकर्ते किंवा ठेकेदाराची शिफारस आणा आसे कधीही सांगितले नाही. जनता आता परिवर्तनेच्या मूडमध्ये आहे. त्यासाठी जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे.
कार्यक्रमास संजय पाटील,शाहूचे संचालक भाऊसाहेब कांबळे, मारुती आनंदा पाटील, संभाजी पाटील, के पी पाटील, मारुती पाटील, जालंदर डोंगळे, सागर कांबळे, मारुती कांबळे, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.
सौरभ कांबळे यांनी स्वागत केले.सागर कांबळे यांनी आभार मानले.
*राजेंना आमदार करण्यासाठी बहूजन समाज आघाडीवर*
युवा कार्यकर्ते आकाश पाटोळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून बहुजन समाज व घाटगे घराण्याचे ऋणानुबंध आहेत. स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पश्चात राजे समरजितसिंह घाटगे यांनी हाच वारसा जपला आहे.बहुजन समाजातील तरुण उद्योग व्यवसायिक व्हावेत यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.त्यांना सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन देत हाच वारसा प्रत्यक्ष कृती कृतीतून जपला. त्यामुळे त्यांनी बहुजन समाजाच्या हृदयात स्थान मिळविले आहे. त्यांना आमदार करण्यासाठी बहुजन समाज आघाडीवर असेल.