शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: क्रिकेटमध्ये रसायनशास्त्र; बास्केटबॉलमध्ये क्रीडा अधिविभाग विजयी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवात आज चौथ्या दिवशी पुरूषांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात रसायनशास्त्र अधिविभागाने एम.बी.ए. विभागावर विजय मिळविला. बास्केटबॉल पुरुष स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रीडा अधिविभागाने अर्थशास्त्र अधिविभागावर विजय मिळविला. आज सायंकाळी वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत अॅथलेटिक्समधील विविध प्रकारांतील विजेत्या क्रीडापटूंना पदक प्रदान करण्यात आले.
शिवस्पंदन स्पर्धेत आज चौथ्या दिवशी, पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटने तृतीय क्रमांक पटकावला. महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये तंत्रज्ञान अधिविभाग आणि गणित अधिविभाग यांच्यात अंतिम सामना उद्या रंगणार आहे.
रस्सीखेच (महिला) स्पर्धेत क्रीडा अधिविभाग, तंत्रज्ञान विभाग, गणित विभाग, वाय. सी. एस. आर. डी., नॅनो सायन्स विभाग यांनी पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुष स्पर्धेत एमबीए, वाय.सी.एस.आर.डी., क्रीडा अधिविभाग यांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
व्हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेत अनुक्रमे तंत्रज्ञान अधिविभाग, ग्रंथालय व माहितीशास्त्र आणि ए.जी.पी.एम. यांनी क्रमांक मिळविले.
कबड्डी (पुरुष) स्पर्धेत क्रीडा अधिविभाग, वायसीएसआरडी, आणि एजीपीएम यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. कबड्डी (महिला) स्पर्धेत क्रीडा अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि गणित अधिविभाग यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले.
बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेत क्रीडा अधिविभाग, अर्थशास्त्र अधिविभाग आणि तंत्रज्ञान अधिविभाग यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक प्राप्त केले.
अॅथलेटिक्स पुरुष व महिला स्पर्धेचा निकाल अनुक्रमे खालीलप्रमाणे:
१०० मी. महिला- सानिया चौगुले (क्रीडा अधिविभाग), आदिती गुरव (भौतिकशास्त्र), ऋचा पाटील (तंत्रज्ञान अधिविभाग),
२०० मी. महिला- मनिषा पाटील (क्रीडा अधिविभाग), प्रेरणा गोडके (तंत्रज्ञान विभाग), सानिया मोमीन (क्रीडा अधिविभाग)
गोळा फेक (पुरुष)- जयवर्धन पाटील (क्रीडा अधिविभाग), ऋषिकेश पाटील (भूगोल), योगेश देशमुख (एमबीए)
लांब उडी (पुरुष)- आर्यन शेजाळ (क्रीडा अधिविभाग), साहिल शिकलगार (रसायनशास्त्र), शुभम कांबळे (क्रीडा अधिविभाग)
४०० मी. (पुरुष)- प्रेम संकपाळ (तंत्रज्ञान), पार्थ कांबळे (क्रीडा), रोहित बिराजदार (जैवतंत्रज्ञान).
अॅथलेटिक्समधील उपरोक्त सर्व विजेत्यांना आज सायंकाळी वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पदक प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी (दि. ७) क्रिकेट (महिला), बास्केटबॉल (महिला), रस्सीखेच (पुरुष) हे सामने होणार आहेत.