‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात छत्रपती राजर्षी छञपती शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमीत्त गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक क्रांतीकारक नेतृत्व होते. बहुजन समाजाला शिक्षण, हक्क व स्वाभिमान देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शाहू महाराजांच्या विचाराने सुरु असलेल्या सहकार व दुग्ध व्यवसायाचा पाया आज गोकुळच्या रूपाने बळकट झाला आहे. गोकुळ संघ हा त्यांच्या चिरंतन विचारांचा पाईक आहे.
गावखेड्यातील शेतकरी, दूध उत्पादक, महिला बचतगट, तरुण उद्योजक यांना सशक्त करण्यासाठी गोकुळने सातत्याने नवे प्रकल्प, अनुदाने व योजनांची आखणी केली आहे. गोकुळच्या प्रत्येक यशामागे शाहू महाराजांचे मूल्य आहे. शेतकऱ्याला आधार, कामगाराला सन्मान आणि सर्वसामान्य माणसाला न्याय. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गोकुळ संघ नेहमीच शेतकरी व दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत राहील, हा विश्वास मी व्यक्त करतो असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया, मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.पी.जे.साळुंके, डॉ.प्रकाश दळवी, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ.विजय मगरे, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.