कोरे अभियांत्रिकीमध्ये आर्डिनो फ्युजन या विषयावरील कार्यशाळेची सांगता

कोरे अभियांत्रिकीमध्ये आर्डिनो फ्युजन या विषयावरील कार्यशाळेची सांगता

वारणानगर (प्रतिनिधी)  - येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल विभाग आणि विन टेकनो सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'आर्डिनो फ्युजन - एनहनसिंग मल्टीडिसिप्लनरी स्किल्स थ्रू मॉडेल मेकिंग' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. मेकॅनिकल विभागाच्या तिसऱ्या वर्षातील १३५ विध्यार्थ्यानी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. आर्डिनो टेक्नोलॉजी वापरून नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करणे, व्यावहारिक अनुभव प्रदान करणे, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. मेकॅनिकल इंजिनीरिंग च्या पलीकडे विस्तारलेल्या बहुविद्याशाखीय ज्ञानाने विध्यार्थ्यांना सुसज्ज्य करणारी हि कार्यशाळा अत्यंत फायदेशीर ठरली.

या कार्यशाळेसाठी विन टेकनो सोल्युशन्स, इचलकरंजी या कंपनीचे डायरेक्टर अवधूत तेले - पाटील आणि सचिन करुमसें यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे,संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने,  मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. जी. एस. कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. 

या प्रशिक्षण मध्ये समन्वयक म्हणून प्रा. एस. एच. पाटील  आणि प्रा. ए. आर. कोळी यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करून प्रात्यक्षिकांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा हा उत्कृष्ट अनुभव होता असे मत प्रशिक्षणार्थी विध्यार्थ्यानी व्यक्त केले.