शिवाजी विदयापीठाचे पहिले नेटबॉल महिला संघ अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

कोल्हापूर : ग्यान विहार विद्यापीठ,जयपूर,राजस्थान येथे आज, दि. ०७ जानेवारी ते ०९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय महिला नेटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ महिला संघ प्रथमच सहभागी होत आहे. संघात 1)साक्षी रमेश कदम( मिरज महाविद्यालय ), 2) वैष्णवी तानाजी मुळीक( आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज,मायणी ) 3)वैष्णवी अनिल आंबी (गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड), 4)काजल बंडू राठोड ( ए सी एस कॉलेज, पलूस), 5)अंजली अनिल माने ( ए सी एस कॉलेज, पलूस) 6)मीनल नसरुल्ला मकानदार ( शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज ), 7)समीक्षा रवींद्र चौगुले ( कन्या महाविद्यालय मिरज ) 8)सुप्रिया विजय लोखंडे( घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर ) 9)समृद्धी संजय नवले ( कॉलेज नॉन कॉन्व्हशनल सायबर कोल्हापूर ) 10)सलोबर अजीजउल्ला मुल्ला ( कमला कॉलेज कोल्हापूर) 11)उत्कर्षा उत्तम तरवाळ ( आजरा महाविद्यालय आजरा ) 12)सौख्या संग्राम पाटील( डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ) यांचा समावेश आहे.
महिला नेटबॉल संघाचे स्पर्धापूर्व शिबीर ३० डिसेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत शिवाजी विद्यापीठ येथे पार पडले. डॉ. धनंजय जयसिंगराव पाटील (आजरा महाविद्यालय,आजरा ), प्रा .पूजा राठोड(कमला कॉलेज,कोल्हापूर) यांचे स्पर्धकांना मार्गदर्शन लाभले.या सर्वांना शिवाजी विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के , प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील, रजिस्टर डॉ. व्ही. एन शिंदे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.