शिवाजी विद्यापीठामध्ये संत सेवालाल महाराज जयंती

शिवाजी विद्यापीठामध्ये संत सेवालाल महाराज जयंती

कोल्हापूर प्रतिनिधी  - संत सेवालाल महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी, समाजशास्त्र अधिविभागातील डॉ.प्रतिभा देसाई, संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.शशीभूषण महाडिक, डॉ.एस.व्ही.राजगुरू, उपकुलसचिव निवास माने, डॉ.मयुरेश पाटील, आकाश ब्राम्हणे, विवेक गनबावले यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.