जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरातील नऊ मंडलाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम आज संपन्न झाले. शेंडा पार्क परिसरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत सर्वांनी श्रमदान करून  वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर लावलेल्या झाडांची देखभाल करत झाडांना सेंद्रिय खत देण्यात आले.  

 

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक पेड माँ के नाम हा संकल्प आपण प्रत्येकाने आचरणात आणून आपापल्या परिसरात वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याचबरोबर येणाऱ्या 2  महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक मंडलात संकल्प से सिद्धी तक या कार्यक्रमा अंतर्गत वृक्ष लागवड संवर्धन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणार असल्याचे नमूद केले.  

यावेळी हेमंत आराध्ये, विशाल शिराळकर, गायत्री राऊत, अमर साठे, गणेश देसाई, किरण नकाते, माधुरी नकाते, मंगला निपाणीकर, गिरीश साळोखे, डॉ. श्वेता गायकवाड, कोमल देसाई, धनश्री तोडकर, अमोल पालोजी, संजय जासूद, अमर साठे, धीरज पाटील, समीर यवळुजे, मानसिंग पाटील, दत्ता लोखंडे, बंकट सूर्यवंशी, प्रीतम यादव, जयराज निंबाळकर, सुधीर देसाई, फिरोज मुजावर, सयाजी आळवेकर, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.