HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शेकडो मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धाराचे भाग्य परमेश्वराने मिळवून दिले - मंत्री मुश्रीफ

शेकडो मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धाराचे भाग्य परमेश्वराने मिळवून दिले - मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - परमेश्वराने शेकडो मंदिराचे बांधकाम आणि जीर्णोद्धाराचे भाग्य मला मिळवून दिले. त्यामुळेच माझे जीवन कृतार्थ आणि आनंदी आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. आजतागायत मी लोकभावनेनुसार काम करीत आलो आहे. देव - देवतांच्या आशीर्वादाच्या पुण्याईची कवचकुंडले माझ्या सभोवती आहेत, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

भडगाव ता. कागल येथील ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आपली श्रद्धा असलेल्या देवालयासाठी ग्रामस्थ किती अंतकरणापासून समर्पित भावनेने पुढे येतात, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे हनुमान देवालय आहे. ग्रामस्थांसह विशेषत: माहेरवाशींनीही मोठ्या भक्तीभावाने या मंदिरासाठी मोठे योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरासाठी ७० लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच; ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एक कोटी रुपयांचे सुंदर मंदिर निर्माण झाले आहे. मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरण व विद्युतीकरणासाठीही २० लाख रुपये आणि शाळा खोल्यांसाठीही निधी देणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केले.

यावेळी माजी सरपंच दिलीप चौगुले यांनी मनोगत केले. 

यावेळी माजी सरपंच एम. एस. पाटील, सुरेशआण्णा सूर्यवंशी, सरपंच बी. एम. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी सरपंच दिलीप चौगुले, ज्ञानदेव मांगोरे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक रणजीत मुडूकशिवाले, उपसरपंच प्रतिभा मांगोरे, पी. आर. पाटील, ज्ञानदेव पाटील, बाबासाहेब चौगले, मधुकर सुतार, समाधान राणे यांच्यासह आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.