HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय राऊत यांनी सरकारकडे केली 'ही' मागणी , आंदोलनासाठी स्मृती इराणी यांना केले आवाहन

संजय राऊत यांनी सरकारकडे केली 'ही' मागणी , आंदोलनासाठी स्मृती इराणी यांना केले आवाहन

मुंबई : जागतिक बाजारामध्ये झालेली पडझड पाहता आता कच्च्या तेलाच्या किंमती घसरण झाली आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पेट्रोल आणि डिझेलची किंमत ५० रूपये आणि सिलेंडर ४०० रूपयाने कमी करावी अशी मागणी केली आहे. तर एलपीजी सिलेंडर ५० रूपयांनी महागल्याने राऊतांनी संताप व्यक्त करत स्मृती इराणी यांना आंदोलन करण्यासाठी आवाहन केले आहे.

स्मृती इराणी, कंगणा राणावत यांनी आंदोलनाचे नेतृत्व करावे 

एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्य किंमती खाली येत असतील तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे. जर ते मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन महागाईमध्ये तेल ओतण्याचं काम करत आहेत. सिलेंडरमध्ये ५० रूपयांनी वाढ झाल्याने लाडक्या बहिणींचे बजेट परत कोलमडलं. माझं आवाहन आहे की, भाजप नेत्या स्मृती इराणी, कंगणा राणावत यांना आंदोलनासाठी आमंत्रित करत आहोत. आमच्या महिलांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, महिलांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. जेव्हा युपीएचं राज्य होतं, तेव्हा महागाईविरूद्ध महिलांचं नेतृत्त्व करत होत्या. रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या, आता सिलेंडर आम्ही पुरवू तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या. अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे.

देशामध्ये सामान्य  माणूस आणि गृहिणींची लूट 

ज्या हिशोबात जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. त्या पाहता भारतात पेट्रोल आणि डिझेल ५० रूपयांत स्थिर असायला पाहिजे. सिलेंडरच्या किमती ४०० रूपयाने खाली यायला हव्या. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, आम्हालाही ते कळतं. या देशामध्ये सामान्य  माणूस आणि गृहिणींची लूट सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.