शैक्षणिक धोरण' सुकाणू समितीवर डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची निवड

शैक्षणिक धोरण' सुकाणू समितीवर डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधि)  : राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी निवारणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वीस सदस्यीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. त्यात ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची निवड केली आहे. ते सध्या शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गठीत केलेल्या या समितीचे अध्यक्ष पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर आहेत. समितीमध्ये यापूर्वी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के कार्यरत आहेत. सरकारने नव्याने काही सदस्यांचा समितीमध्ये समावेश केला आहे. त्यात प्राचार्य डॉ. पाटील यांचा समावेश झाला आहे.