श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज कागलच्या प्राचार्य पदी बी.के.मडिवाळ तर उपप्राचार्य पदी सेो एस.एस.पाटील यांची नियुक्ती*
पत्रकार- सुभाष भोसले
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज कागल येथे श्री बी.के.मडिवाळ यांची प्राचार्यपदी तर उपप्राचार्य पदी सेो. एस.एस.पाटील यांची नियुक्ती झाली.या निवडी बद्दल माजी प्राचार्य जे डी पाटील, उपमुख्याध्यापक टी.ए.पोवर, पर्यवेक्षक एम.व्ही.बारवडे, किमान केोशल्य प्रमुख एस.जी.पाटील, तंत्र विभाग प्रमुख एस.यु.देशमुख, मानसिंग निबांळकर तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक ,शिक्षिका, सर्व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य सेो. एस एस पाटील यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय याप्रमाणे कार्य करून विद्यार्थी हित जोपासण्याला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. प्राचार्य बी के मडिवाळ यांनी सर्वांना सोबत घेऊन संस्थेचा व शाहू परिवाराचा नावलेोकिक. वाढवण्याचा प्रयत्न करण्यास कटिबंध आहे असे मत आपल्या भाषण्यात व्यक्त केले. या निवडीसाठी संस्थेचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, अध्यक्ष शिवानीताई देसाई,चेअरमन प्रा.डाॅ.मंजिरी देसाई- मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर देोलत देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, प्राचार्य व कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे वरिष्ठ लिपीक के बी वाघमोडे यांचे प्रोत्साहन मिळाले.नुतन प्राचार्य बी के मडिवाळ व उपप्राचार्य सेो. एस एस .पाटील यांनी सर्व पदाधिका-यांचे आभार मानले.