संच मान्यतेच्या शासन निर्णयाविरुद्ध शिक्षकांचे 15 जून रोजी आंदोलन

संच मान्यतेच्या शासन निर्णयाविरुद्ध शिक्षकांचे 15 जून रोजी आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आर्थिक बचतीच्या नावाखाली संचमान्यतेच्या आडून शिक्षक संख्या कमी होत आहे. हा महाराष्ट्राच्या विकासाला, प्रगतीला, खोडा घालणारा संचमान्यता शासन निर्णय आहे. असा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला. या निषेधार्थ 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समितीच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

आधी एक ते दहा पटासाठी एक शिक्षक, एक ते वीस पटासाठी एक नियमित व सेवानिवृत्त शिक्षक होते. तसेच आधी 31 पटाला 2 शिक्षक होते, आता 46 पटाला 2 शिक्षक, तसेच 61 पटाला 3 शिक्षक होते, तर आता 76 पटाला 3 शिक्षक , 91 पटाला 4 शिक्षक होते तर आता 104 पटाला 4 शिक्षक आहेत. अशाच प्रकारे 210 च्या पटाच्या पुढे 40 पटाला 1 शिक्षक मिळणार आहेत. जगाचा विचार केला तर 10 पटाला किंवा जास्तीतजास्त 15 पटाला शिक्षक आहे. पण महाराष्ट्रात तो निकष 30 वरून ४० विद्यार्थी संख्ख्येवर चालला आहे. याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच हे आंदोलन संपूर्ण राजभरात एकाच दिवशी होणार आहे

या पत्रकार परिषदेस प्रमोद तौदकर,अर्जुन पाटील, गणपती मांडवकर,वर्षा केनवडे,बाबासाहेब खोत , विनायक मगदूम, प्रमोद भांदिगरे, हरिदास वर्णे,संजय पाटील,संजय कडगांवे , युवराज काटकर , अस्मिता मगदूम, संजय कुंभार , आनंदा डाकरे, संतोष पाटील, राजकुमार चौगले उपस्थित होते.