ओ. डी. एफ. प्लस 75 दिवसांचे विशेष अभियान राबविण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना

ओ. डी. एफ. प्लस 75 दिवसांचे विशेष अभियान राबविण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन(ग्रा)- टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारी मुक्त करणेसाठी, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना गती देण्यासाठी. ODF Plus - 75 दिवसांचे विशेष अभियान राबविणेची सुचना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन. एस. यांनी आज तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी व उपअभियंता , ग्रामीण पाणी पुरवठा यांना दिली आहे.

हे विशेष अभियान नियोजीत वेळेत पुर्ण करणेसाठी दिनांक 10 जुन ते 24 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्याबाबत कामाचे वेळापत्रक तालुक्यांना देणेत आले आहे.

  स्वच्छ भारत मिशन(ग्रा)- टप्पा 2 च्या मार्गदर्शक सुचना शासनाकडुन निर्गमित झालेल्या आहेत, सदर मार्गदर्शक सुचनानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)- टप्पा 2, ODF प्लस संकल्पनेंतर्गत पुढील प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ODF प्लस ही संकल्पना राबविणे संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

शाश्वत हागणदारी मुक्त दर्जा घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन दृश्य स्वच्छता ODF Plus जनजागृती संदेश या अंर्तगत आपल्या जिल्ह्यातील एकुण 921 गावे हागणदारी मुक्त अधिक झाली असुन यामध्ये 148 गावे मॉडेल, 771 गावे ॲस्पायरिंग झालेली आहेत उर्वरीत 1043 गावे मॉडेल व उर्वरीत 272 गावे हागणदरीमुक्त करावयाची आहेत.

   वरील निकषापैकी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाची प्रगती अत्यंत कमी असुन सदर कामांना गती प्राप्त होणेसाठी व कामे मुदतीत पूर्ण होणेसाठी सदरचे विशेष अभियान राबविणेत येत आहे.

  1043 गावे मॉडेल करणे व 272 गावे ॲस्पायरिंग करणेसाठी ODF Plus 75 दिवसांचे विशेष अभियान राबविला जाणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये 5000 लोकसंख्येखालील गावामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण करणे तसेच 5000 लोकसंख्येवरील गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करणे . 

    सदर कामे पुर्ण झाले नंतर कामांचे फोटो SBM 2.0 ॲप व्दारे जिओ टॅग करणेत यावी व सदर गावांचे ग्राम सभांचे ठराव करुन गावे ODF Plus घोषीत करणेत येणार आहेत. तसेच 5000 लोकसंख्येवरील गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांच्या प्रशासकिय मान्यता पूर्ण करणेबाबतचे नियोजन करणेत आले आहे.