संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा माजी विद्यार्थी मिलाप ॲल्युमिनीमीट २०२५ कार्यक्रम संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा माजी विद्यार्थी मिलाप ॲल्युमिनीमीट २०२५ कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी  : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी. विद्यार्थी "मिलाप ॲल्युमिनी मीट २०२५" या कार्यक्रमास माजी. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला. “संजय घोडावतइन्स्टिट्यूट असोसिएशन” धर्मदाय नोंदणी कृत संस्थेचे रजिस्ट्रेशन केलेले आहे.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी  कार्यक्रम समन्वयक, प्रा. विशाल तेली, डिप्लोमा विभागाचे सर्व विभागप्रमुख, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विशाल तेली यांनी केले कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थित विद्यार्थ्यांचे शब्द सुमनाने स्वागत करून याकार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्देश नमूद करून  जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांचा उपयोग नवीन इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्लेसमेंट आणि नवीन स्टार्टअप करण्यासाठी उद्योग जगतामध्ये कामकरत असणाऱ्या माजी. विद्यार्थांना इन्स्टिट्यूट अंतर्गत सहकार्य केले जाईल, ज्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट स्किल आहेत, त्यांनी नवीन इंजिनिअरिंग शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षाव्यक्त केली. डॉ. गिरी यांच्या हस्ते प्रत्येक विभागातील “उत्कृष्ट”कार्य करणाऱ्या विद्यार्थ्याना  “डिस्टिङ्ग्विश्ट् ॲल्युमिनी २०२५” हा  अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.  माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करून इन्स्टिट्यूट विषय गौरव उद्गार काढले यामध्ये अतिश शिंगे म्हणाले डॉ. गिरी यांच्यामार्गदर्शनामुळे आणि अनुभवी उत्कृष्ट शिक्षकांमुळे सिव्हील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनणे सहज शक्य झाले. वीरेंद्र भोसले,मनीष कुलकर्णी, सानिका गुरव, अनिस जगदाळे, प्रवीण आरगे,सार्थक गणबोटे, सुजय रावूत व इतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार  प्रणेत भोसले, निकिता पाटील यांनी केले.    

संजय घोडावत विद्यापीठचे चेअरमन,संजयजी घोडावत,  विश्वस्त, विनायक भोसले, यांनी माजी. विद्यार्थी “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोसिएशन” वाटचालीसशुभेच्छा दिल्या.