HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संभापुरात 2 सख्या लहान भावांचा मृत्यू गावावर शोककळा

संभापुरात 2 सख्या लहान भावांचा मृत्यू गावावर शोककळा

हातकणंगले (प्रतिनिधी) - हातकणंगले तालुक्यातील संभापूर गावावर शोककळा पसरली आहे. पोवार कुटुंबातील अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन लहान भावंडांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत घडली.

मृत्यू पावलेली मुले म्हणजे वरद सागर पोवार (वय ६) व विराज सागर पोवार (वय ४) अशी आहेत. मंगळवारी दोघांनाही पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर पेठ वडगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. काहीसा आराम मिळाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

मात्र गुरुवारी तब्येत पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. लहान भाऊ विराज याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहावर पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

या दु:खद घटनेतून कुटुंब सावरते न सावरते, तोवर मोठा भाऊ वरद याचीही प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

एकाच घरातील दोन गोंडस मुलांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई पूजा सागर पोवार याही आजारी असून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या दोन्ही मुलांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अंतिम शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. ही दुर्दैवी घटना संपूर्ण गावाला भावनिक धक्का देणारी ठरली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.