कोरे अभियांत्रिकीचे ग्रंथपाल के. एन. ताम्हाणे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

कोरे अभियांत्रिकीचे ग्रंथपाल के. एन. ताम्हाणे यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

वारणानगर (प्रतिनिधी) : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातील ग्रंथपाल के. एन. ताम्हाणे यांनी पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे. 

प्रा. के. एन. ताम्हाणे हे ग्रंथालय विभागातील अनुभवी व्यक्तिमत्व असून, त्यांनी "दक्षिण महाराष्ट्रातील निवडक अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवलंबण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तुलनात्मक अभ्यास" या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. 

या संशोधनासाठी त्यांना वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.