भाजपा जिल्हा कार्यालयात विवेक मंद्रूपकर यांचे फाळणी दिवस विषयावर व्याख्यान संपन्न

भाजपा जिल्हा कार्यालयात विवेक मंद्रूपकर यांचे फाळणी दिवस विषयावर व्याख्यान संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधि) : १४ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात विभाजन विभिषिका अर्थात फाळणी दिवस या विषयावर विवेक मंद्रूपकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा विभाग प्रचार प्रमुख म्हणून संघाची जबाबदारी असणाऱ्या विवेक मंद्रूपकर यांनी भारत देशाची फाळणी का झाली, त्यामागे कोणते षडयंत्र होते इत्यादी गोष्टींचा सविस्तर वृत्तांत सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, १८५७ साली देश स्वतंत्र होण्यासाठी अखंड भारत लढत होता परंतु त्यानंतर इंग्रजांनी फूट पाडा व राज्य करा या नीतीने एकसंघ असणाऱ्या भारत देशाला फाळणी पर्यंत नेऊन ठेवले याचाच परिपाक म्हणून १९४७ साली अगदी चार तासात मसुदा तयार करून या देशाची फाळणी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तान मधून येणाऱ्या हिंदू निर्वासित समाजावर अत्याचार झाले परंतु चुकीचा इतिहास मांडून ७० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसने अगदी बेमालूमपणे हा इतिहास लपवला होता म्हणूनच मागील पाच ते सहा वर्षांपासून १४ ऑगस्ट या दिवशी विभाजन विभिषिका हा दिवस ओळखला जातो व नवीन पिढीला या फाळणी संदर्भात विस्तृत माहिती दिली जाते. अखंड भारताचे स्वप्न पाहण्यासाठी पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने तयार होण्यासाठी समाजामध्ये सम्मीलीत व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, सरचिटणीस गायत्री राऊत, डॉ सदानंद राजवर्धन, संजय सावंत, हेमंत आराध्ये, राजसिंह शेळके, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, दिग्विजय कालेकर, सुरेश खिस्ते, रूपाराणी निकम, वैभव माने, आशिष कपडेकर, अमर साठे, गिरीष साळोखे, प्रदीप उलपे, सचिन कुलकर्णी, सागर रांगोळे, सुरेश गुजर, सतीश घरपणकर, प्रकाश सरनाईक, ढवळे, सरिता हरुगले, श्वेता गायकवाड, कोमल देसाई, के. समश्री, छाया साळुंखे, शामली भाकरे, दिलीप मेत्रानी, रणजीत औंधकर, डॉ शिवानंद पाटील, प्रवीण शिंदे, पारस पालीचा, सतीश आंबर्डेकर, दिलीप बोंद्रे, कार्तिक देशपांडे, विशाल शिराळे, संतोष माळी, राजू जाधव, सचिन पोवार, महेश यादव, निरंजन घाटगे, सचिन मुधाले, अनिल कामत, योगेश कांगठाणी, अशोक लोहार, महादेव बिरंजे, हर्शांक हरळीकर, वंदना बंबलवाडे, महेश चौगले, बंकट सूर्यवंशी, वेदार्थ राजवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.