"वर्षभरापासून मनिपुर जळतंय , त्याकडे.." मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला,
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि एनडीएची सत्ता आली आहे. तर मोदींनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातल्या निवडणुकीवर, राजकारणावर आणि मणिपूरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय या समारंभाला ते संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी मणिपूरबाबत भाष्य केलं आहे.
वर्षभरापासून मणिपूर जळतंय…
मणिपूरबाबत मोहन भागवत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मागच्या वर्षभरापासून अधिक काळ मणिपूर जळतंय, मणिपूरचा विचार करुन तिथे शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. हे कुणी घडवून आणलं आहे? याकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून बरीच कामं करायची आहेत. सगळी कामं सरकार करणार नाही. मणिपूर अनेक वर्ष शांत होतं. आता पुन्हा पेटलं आहे. जुने वाद बंद झाले पाहिजेत. द्वेषाचं वातावरण निर्माण झाल्याने मणिपूरमध्ये वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे मणिपूर शांत करण्यासाठी प्राधान्य देणं आवश्यक आहे.” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.