समस्त भारतीयांनी छायाकल्प चंद्रग्रहण निरीक्षण करून विज्ञान वादी बनावे- किरण गवळी, खगोल अभ्यासक
पत्रकार- सुभाष भोसले
आज दिनांक 5 मे रोजी संपूर्ण भारतातून छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे, भारतातून दिसणारे हे यावर्षीचे पहिले ग्रहण आहे, या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून किंवा विरळ छायेतून जातो, त्यामुळे थोडासा अंधुक दिसतो, म्हणून याला छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात , नेहमी चंद्राच्या तेजाचे निरीक्षण करणाऱ्याला हा फरक जाणवेल,
सूर्य ,पृथ्वी व चंद्र एका रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि चंद्रग्रहण लागते, चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत, एक खग्रास चंद्रग्रहण , आणि दुसरे छायाकल्प चंद्रग्रहण, अंतराळात पृथ्वीची सावली सातत्याने पृथ्वीच्या गती बरोबरच प्रवास करत असते, पृथ्वीची सावली गडद आणि विरळ अशी दोन प्रकारची असते , पृथ्वीच्या गडद छायेतून चंद्र जेव्हा प्रवास करतो , तेव्हा खग्रास चंद्रग्रहण लागते, आणि या खग्रास चंद्रग्रहणातील चंद्र तांबूस, लालसर दिसतो , तसेच पृथ्वीच्या विरळ छायेतून जेव्हा चंद्र जातो तेव्हा तो नेहमी इतका तेजस्वी न दिसता थोडा मळकट दिसतो, आजच्या छायाकल्प चंद्रग्रहणामध्ये सुद्धा चंद्र थोडा मळकट दिसणार आहे,
सदरचे छायाकल्प चंद्रग्रहण अशिया , ऑस्ट्रेलिया , पूर्व आफ्रिका, युरोप, पॅसिफिक आणि इंडियन अटलांटिक महासागरातून दिसेल,
भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजून 44 मिनिटांनी पृथ्वीच्या विरळ छायेतून चंद्राचा प्रवास सुरू होईल, आणि छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल, ग्रहण मध्य 10 वाजून 52 मिनिटांनी असेल, आणि ग्रहणाची समाप्ती म्हणजेच पृथ्वीच्या विरळ छायेतून चंद्र पूर्णपणे बाजूला 1 वाजून 1 मिनिटांनी जाईल,
समस्त भारतीयांनी हे छायाकल्प चंद्रग्रहण सर्व प्रकारच्या जुन्या समजूती बाजूला ठेवून साध्या डोळ्यांनी स्वतः पाहावे , आणि इतरांना पाहायला परवृत्त करावे , ग्रहण काळातील चंद्र तेज नेहमीपेक्षा 5 टक्क्यांनी कमी झालेले स्वतः निरीक्षण करून विज्ञानवादी बनावे ,
किरण गवळी, खगोल अभ्यासक , कोल्हापूर, 9922666111