शरद कृषीच्या विद्यार्थ्यांची राहुरी विद्यापीठ संघात निवड

जैनापूर प्रतिनिधी : जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राहुरी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. राज्य पातळीवर होणाऱ्या २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव (अश्वमेध) ही स्पर्धा गोडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होत आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कबड्डीचा संघामध्ये कु. समुध्दी पाटील (चतुर्थ वर्ष), सम्मेद मुरचिटे (प्रथम वर्ष), बास्केटबॉल संघामध्ये वैभव शिंदे (तृतीय वर्ष) या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. तसेच प्राध्यापक दादासाहेब रा. मगदूम यांची व्हॉलिबॉल संघाचे कोच म्हणून निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यी व प्राध्यपकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर), संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. एस एच फलके, क्रीडा शिक्षक प्राध्यापक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.