'साई स्पर्श' लहान मुलांचे आरोग्य मंदिर

'साई स्पर्श' लहान मुलांचे आरोग्य मंदिर

कोल्हापूर प्रतिनिधि: मंगळवार पेठ येथील चौकातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटलचा तिसरा वर्धापन दिन आणि नव्याने विकसित केलेल्या युनिट क्रमांक दोनचा शुभारंभ रविवारी मुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाला.

डॉ. जाधव म्हणाले, बालकांवरील अत्याधुनिक उपचारासाठी पुणे आणि मुंबईला रुग्णाला जावे लागत होते. मात्र गंभीर, अति गंभीर आजारांवर तत्काळ जागतिक दर्जाचे उपचारासाठी आणि सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया एकाच छताखाली' या हॉस्पिटलने उपलब्ध करून दिल्या. हे हॉस्पिटल नसून लहान मुलांचे आरोग्य मंदिरच असून येथील डॉक्टर देवदूत आहेत.

यावेळी डॉ. व्यंकटेश तरकसबंद, डॉ. विजय गावडे, डॉ. रुपाली पाटील, डॉ. अमर गिरवलकर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, जनरल प्रक्टिशियन असोसिएशनच्या डॉ. वर्षा पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. गीता पिलाई आदी उपस्थित होते. डॉ. तरकबंद यांनी अत्याधुनिक उपचाराचा आढावा घेतला. आतापर्यंत हॉस्पिटलने ६ हजार बालकांना जीवनदान दिले असल्याचे सांगितले. डॉ. अमर नाईक, डॉ. अमृता शिवछंद, डॉ. पूनम रायकर, डॉ. संचेती पाटील, डॉ. विनय कुर्ले, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. रमण पाटील, डॉ. स्नेहा माने आदी उपस्थित होते. डॉ. रुपाली पाटील यांनी आभार मानले.