लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रतिसाद - मा. आ. अमल महाडिक
कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नव मतदार नोंदणी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थी नोंदणीसाठीच्या शिबिराला युवा वर्गातून प्रतिसाद मिळाला असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
यासोबतच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आयुष्मान भारत योजना यासारख्या विविध योजनांची नोंदणी करण्यात आली होती. या शिबिरात तब्बल 30274 लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली. शहर परिसरात मिळालेल्या उदंड प्रतिसादनंतर या शिबिरांचे आयोजन दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मध्येही आजपासून करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच नव मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून विकसित भारतासाठी मतदान करावे असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले आहे.
विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माता-भगिनी पर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे महाडिक म्हणाले. अंगणवाडी सेविका, महा-ई-सेवा केंद्र तसेच शासनाच्या प्रतिनिधींकडेच महिलांनी नोंदणी करावी असे आवाहन महाडिक यांनी केले. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शंका दूर करण्यासाठी विशेष यंत्रणा राबवल्यामुळे या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
संपूर्ण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एक लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची तयारी केली असल्याचं माजी आमदार अमल महाडिक म्हणाले.
प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे याच ध्येयाने सर्व यंत्रणा काम करत आहे. नागरिकांनीही वेळेत नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन महाडिक यांनी केले.