सावरवाडी येथील यूवा खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत केले वृक्षारोपण
बहिरेश्वर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील मौजे सावरवाडी येथील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत सावरवाडी यांच्या सहकार्याने भैरवनाथ देवस्थान गावपट्टी येथे बाळासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण केले. या प्रसंगी पिंपळ, कडुनिंब,जांभुळ,करंजी,चेरी धावडा,अशा औषधी व बहुगुणी 100 झाडांची लागण करण्यात आली.
सध्या वाढते प्रदूषण,वृक्षतोड काॅंक्रीटीकरण आदी कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून जागतिक तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट उसळली आहे.. भविष्यात यावर जालीम उपाय शोधायचा असेल तर प्रत्येकांने निदान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे .शासनामार्फत यासाठी रोपे मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत.या योजनेत सावरवाडी येथील युवकांनी सहभाग घेवून केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी धनंजय खाडे, निलेश खोपकर, प्रकाश तिबीले,किरण दिवसे,प्रदीप जाधव, नवनाथ जाधव, सुनील हराळे, योगेश खोपकर,अमित जाधव, गणेश जाधव, प्रदीप खोत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..