HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेल्स मध्ये निवड

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेल्स मध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील स्कूल  ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) अंतिम वर्षात शिकणाऱ्या १५ विद्याथ्यांची नामांकित हॉटेल मध्ये नोकरीसाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थाप नाकडून मुलाखतीद्वारे  ही निवड करण्यात आली

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी. एस. सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्ार्थ्यांना उपस्थित करून दिली जाते. देशाच्या विविध शहरांमध्ये  पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या  कंपन्यांनी महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

यामध्ये आय टी सी बेळगावच्या वेलकम हॉटेलमध्ये प्रथमेश काळे, रितेश खटावकर, इंद्रजीत खोत, शिवम पाटील, मुंबई येथील ग्रॅब्ज किचन   यश लोखंडे व राजप्रसाद पिळणकर यांची,  गोवा येथे स्टोनवूड हॉटेल एंड रिसोर्टमध्ये  ओंकार यादव, दीक्षांत गावडे, पुणे येथील थाइम एंड व्हिस्कमध्ये भगतसिंग पोळ, समर्थ क्षीरसागर, दर्शन मोरे, प्रथमेश पाटील यांची,  पुण्याच्या हयात प्लेसमध्ये अर्चिता सतीजा, राकेश ढेरे, साद शेख या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये डिप्लोमा, डिग्री या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, यामध्ये प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी केले.  

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.