सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ कक्ष कार्यरत

सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ कक्ष कार्यरत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ हा कक्ष कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यासाठी 24 तास मोफत समुपदेशन सेवा देण्यात येत आहेत. मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास टोल फ्री क्रमांक 14416 /18008914416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांनी केले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेली मेंटल हेल्थ असिस्टंस अॅड नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेटस (टेलि-मानस) या उपक्रमाची सुरुवात केली आहे. टेलिमानस सेवाद्वारे लोंकाना मानसिक आरोग्याबद्दलची माहिती, समुपदेशन, सल्ला आणि उपचार घेण्यास प्रोत्साहित केले जाते, तसेच देशभरात मानसिक आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढविणे व त्यांच्यामधील मानसिक आजाराबद्दल गैरसमज दूर करणे तसेच प्रत्येक रुग्णांपर्यंत आवश्यक ती सेवा पोहचवणे हे या मागचे उद्दिष्ट आहे.

मानसिक समस्यांची लक्षणे- स्क्रिझोफ्रेनिया संशय येणे/ विचित्र वर्तन/ कानात आवाज, मेनिया/हर्षवायू/ अती उत्साहिपणा, एक कृती वारंवार करणे/ विचार कृती अनिवार्य विकृती, नैराश्य/उदासीनता/आत्महत्येचे विचार येणे, व्यसन (दारु, तंबाखू, मावा, गुटखा, मोबाईल, गेम), स्मृतीभ्रंश/ विसरभोळेपणा, प्रसुतीपश्चात नैराश्य/उदासिनता (PTSD), झोपेच्या संबंधित समस्या, चिंता/भिती, काळजी वाटणे, एन्युरेशीस (वयाच्या 5 वर्षानंतरही अंथरुणामध्ये लघवी करणे), शाळेत जाण्याची भिती/ शाळा बुडविणे, पटकन राग/ चिडचिड करणे/ हट्टीपणा, अभ्यासाचा कंटाळा / परीक्षेची भिती वाटणे, स्वमग्न/ अतिचंचलपणा, एकलकोंडेपणा/ आत्मविश्वास कमी होणे, कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करता न येणे, ताण-तणाव व्यवस्थापन ही लक्षणे आढळतात.