स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ४ लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून  ४ लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त
#बेकायदेशीर_गुटखा _जप्त #Kolhapur_News

कोल्हापूर / प्रतिनिधी : 

करवीर तालुक्यातील कंदलगाव-पाचगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल चार लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी मसाला जप्त केला आहे.

निपाणी येथून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक कंदलगाव पाचगाव रस्त्यावरून होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत एक चारचाकी गाडी आणि चार लाख २१ हजार ३५० रुपये किमतीचा गुटखा, सुगंधी सुपारी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक उमर मौला पेंढारी (रा. फुलेवाडी पहिला बस स्टॉप जवळ ) याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बाळाजी पाटील, दीपक घोरपडे, विजय गुरखे, हिंदुराव केंकरे, सोमराज पाटील यांनी ही कारवाई केली.