स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

कागल (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला 

       स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे आभाळा एवढा माणूस आहे. मागील वर्षी ऊस दराचा तोडगा काढताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करून ज्या साखर कारखान्यांनी तीन रुपयांच्या वरती दर दिलात्यांनी प्रति टन आणखीन पन्नास रुपये व ज्यांनी तीन रुपयापर्यंत दर दिला त्यांनी शंभर रुपये जादा देण्याचा तोडगा काढून चांगली भूमिका घेतली होती. त्याचबरोबर ते नेहमी अशा चळवळीलाही बळ देतात. म्हणून संघटनेच्या वतीने त्यांना आमचा जाहीर पाठिंबा असून प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्यावे.

     पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अगदी ऐतिहासिक वळणावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन मला बळ दिलेले आहे. त्यांचे जे प्रश्न असतील ते आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यांना योग्य मानसन्मान दिला जाईल, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन चूक केली असे कधीच वाटणार नाही. अशाच पद्धतीचे आम्ही त्यांच्याशी वागू, असेही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. 

       यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष नामदेव भराडे, पक्ष अध्यक्ष तानाजी मगदूम, कापशी खोरा अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष शिवाजी कळमकर, संभाजी यादव, नितेश कोगनोळी, पांडुरंग चौगुले, भरत बेलवलेकर, पांडुरंग अडसूळ, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.