HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मतदासंघ रोल मॉडेल करण्याच्या बाता मारणारे दहा वर्षांत झोपले होते काय? - के पी पाटील

मतदासंघ रोल मॉडेल करण्याच्या बाता मारणारे दहा वर्षांत झोपले होते काय? - के पी पाटील

आजरा (प्रतिनिधी) : यांनी एमआयडीसी केली नाही, सोनवडे - शिवडाव घाट झाला नाही, कुठल्याही धरणाची, बंधाऱ्याची गळती यांना थांबविता आली नाही, पर्यटन वाढीसाठी यांनी काहीही केलेले नाही आणि आता राधानगरी विधानसभा मतदारसंघ राज्यात रोड मॉडेल करण्याच्या हे बाता मारीत आहेत. मग गेल्या दहा वर्षांत कमिशनच्या माध्यमातून कमावलेला बक्कळ पैसा उशाला ठेवून तुम्ही झोपा काढत होता काय ? असा खडा सवाल माजी आमदार के पी पाटील यांनी आमदार आबिटकर यांना विचारला.

 आमदार आबिटकरांनी केलेल्या आरोपांना पारेवाडी (ता.आजरा) येथे झालेल्या प्रचारसभेत के पी पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले.

ते पुढे म्हणाले,"मतदारसंघातील काळम्मावाडी, मेघोली, निष्णप,म्हासरंग,फये, सर्फनाला अशा अनेक धरणे व बंधाऱ्यांना लागलेली गळती,उपशाचे प्रश्न तुम्हाल तब्बल दहा वर्षांत दिसले नाहीत. रोजगार नाही म्हणून गावोगावचे युवक पन्नास - साठ किलोमीटरचा रोजचा प्रवास करून एमआयडीसी कडे जातात त्यांच्यासाठी दहा वर्षात तुम्ही एखादी एमआयडीसी सुरू केली नाही की निसर्गसंपन्न राधानगरी भुदरगड,आजरा तालुक्यात पर्यटनासारखा व्यवसाय वाढावा यासाठी तुम्ही काहीही केले नाही. फक्त बगलबच्चाना कंत्राटे देण्यात धन्यता मानण्यात तुमची दहा वर्षे गेली आणि आमच्याकडे दहा वर्षाचा हिशोब कशाला मागता ?"

स्वागत व प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले. यावेळी दत्तात्रय पाटील, जी एम पाटील, राहुल देसाई आदींची भाषणे झाली. या दरम्यान आजऱ्यासह तालुक्यातील एरंडोल,लाटगाव,कोरीवडे, किरवडे,घाटकरवाडी, लिंगवाडा, सुळेरान,आंबार्डे, धनगरमोळा, गवसे,दर्डेवाडी आदी गावांचा प्रचार दौरा झाला. यावेळी मुकुंद देसाई,सुधीर देसाई, उदय पवार, राजू होलम,आनंदराव जोशिलकर, संजय सावंत, ॲड. जावेद दीडबाग, रियाज तकीलदार, रशीद पठाण, इकबाल शेख, मेहताब आगा, सलीम लतीफ आदींसह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

*उलटा चोर कोतवाल को डाँटे* 

दहा -वीस वर्षांपूर्वी आम्ही केलेली विकासकामे आजही मजबूत स्थितीत आहेत. यांनी मात्र ज्यामध्ये कमिशन मिळेल अशी कामे भागीदारीत करण्यात आपली दहा वर्षांची आमदारकी पणाला लावली. आणि तेच आम्हाला आमच्या कारकिर्दीबद्दल विचारतात म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी परिस्थिती झाल्याचे के पी पाटील म्हणताच सभेत टाळ्या आणि शिट्टयांचा आवाज घुमला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.