कोल्हापूर विभागीय मंडळाचा १० वी व १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर

कोल्हापूर विभागीय मंडळाचा १० वी व १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर या विभागामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी जून - जुलै २०२५ पुरवणी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला.

इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. तसेच लेखी परीक्षा एकूण ३४ केंद्रावर घेण्यात आली. यामध्ये सातारा मधील ९, सांगली ११ तर कोल्हापुरातील १४ इत्यादी केंद्रावर घेण्यात आली. 

तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा २६ जून ते १७ जुलै या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. २४ जून ते ११ जुलै या कालावधीत घेण्यात आलेली लेखी परीक्षा एकूण २५ केंद्रावर घेण्यात आली. यामध्ये सातारा ६, सांगली ९ तर कोल्हापुरातील १० इत्यादी केंद्रावर घेण्यात आली. 

जून - जुलै पुरवणी परीक्षा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल - दहावीचा २१.९८% निकाल लागला आहे. 

जून - जुलै पुरवणी परीक्षा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल - बारावीचा ३३.८३% निकाल लागला आहे.

गुण पडताळणी, उत्तर पत्रिका छायाप्रती व पुन्हा मूल्यांकनासाठी कालावधी - ३० जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.