अंधेरीत इमारतीला आग; जीवितहानी नाही
मुंबई : मुंबईत एका इमारतीला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. अंधेरी भागात ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. मीरा रोडवरील ही इमारत असून सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीचं स्वरूप हे खूप मोठं असून आगीचे लोळ सर्वत्र पसरत असताना दिसत आहेत. या इमारतीमध्ये मोठ्या संख्येने लोकं वास्तव्य करीत आहेत. आगीच्या या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
रहिवाशांना इमारतीमधून सुरक्षेत बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू सुरू आहे. आगीत कोणतीही जीवितहानी नसल्याचे पुढे येतंय. मात्र, या आगीमध्ये फ्लॅट जळून खाक झाल्याचेही सांगितले जात आहे. या आगीच्या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे कळतंय. ही आग आज सकाळी लागल्याचे सांगितले जातंय. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला ही आग लागलीये.
आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या आगीच फ्लॅटचे मोठे नुकसान झाले. लोकांना इमारतीमधून सुरक्षेत बाहेर काढले जातंय. अग्नीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही आग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. ही इतकी मोठी आग लागलीच कशी, कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. आगीचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.आता या आगी प्रकरणाचा तपास हा स्थानिक पोलिस प्रशासन आणि अग्नीशामक दलाकडून केला जातोय.