कागलमधील परिवर्तनाच्या लाटेची व्हन्नाळीतून सुरुवात- समरजितसिंह घाटगे

कागलमधील परिवर्तनाच्या लाटेची व्हन्नाळीतून सुरुवात- समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) . कागल विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे.या परिवर्तनाच्या लाटेची सुरुवात व्हन्नाळीतूनच झाली आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे  यांनी केले.

 व्हन्नाळी (ता.कागल) येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच सदाशिव जाधव होते.

घाटगे पुढे म्हणाले, गेली 25 वर्षे ज्यांच्याकडे आमदारकी आहे. त्यांनी जाणीवपूर्वक व्हन्नाळी गावाला विकासापासून वंचित ठेवले. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून आमचे या गावाशी अतूट ऋणानुबंध आहेत.माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळचे संचालक अमरीष घाटगे यांच्याशी कोणतेच मतभेद नाहीत.राजे गटाकडून काहीही झाले तरी त्यांच्याबाबत सभा किंवा सोशल मीडियातून कोणतीच चुकीची वक्तव्ये झालेली नाहीत.वेळोवेळी त्यांचा मानसन्मान राखला आहे.भूतकाळात नकळत घडलेल्या काही चुका दुरुस्तही केल्या आहेत. त्यामुळे आपसातील संघर्षातून होणारे नुकसान टाळून गट-तट,आडवा-आडवी, जिरवा-जिरवीची विघातक प्रवृत्ती थोपविण्यासाठी एकसंघपणे निवडणुकीस सामोरे जाऊया.

 दिनकर वाडकर यांनी स्वागत तर नामदेव बल्लाळ प्रास्ताविक यांनी केले. यावेळी प्रभाकर हात्रोटे, शामराव बल्लाळ, प्रदीप जाधव, राजू वाडकर, धनाजी जाधव, महादेव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

  बैठकीस संभाजी जाधव, मारुती कुळवमोडे, दादू जाधव, दशरथ पाटील, सचिन जाधव, बाबुराव पवार, संग्राम वाडकर आदी प्रमुख उपस्थित होते. दत्तात्रय कुळवमोडे यांनी आभार मानले. 

मतभेद असतील पण मनभेद नाही

 घाटगे गटातील कार्यकर्त्यांत मतभेद पसरवून कागलच्या घाटगे गटाच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्र्यांनी आपली राजकीय पोळी भाजली. तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेल्या व्हन्नाळीसारख्या गावाला आदिवासी व भकास गावाची उपमा देऊन  या गावाचा त्यांनी अपमान केला. या परिसरातील शेतकऱ्यांची जीवनदायींनी असलेल्या अन्नपूर्णा योजनेच्या बाबतीत कावळ्याच्या डोळ्यातून पाणी येईल पण अन्नपुर्णेच्या नळ्यातून पाणी येणार नाही. असे अपमानास्पद वक्तव्यही त्यांनी केले.गेल्या 30-35 वर्षांमध्ये दोन्ही घाटगे गटाची मोठी ताकद त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यामध्ये खर्च झाली.घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद जरूर झाले पण मनभेद झालेले नाहीत. त्यामुळे झाले गेले विसरून आता या निवडणुकीत पारंपरिक विरोधकाला थोपवण्यासाठी एकत्र येऊया अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या