अनंतशांती संस्थेमार्फत मळगे खुर्द येथे डोळे तपासणी शिबीर पार

अनंतशांती संस्थेमार्फत मळगे खुर्द येथे डोळे तपासणी शिबीर पार
अनंतशांती संस्थेमार्फत मळगे खुर्द येथे डोळे तपासणी शिबीर पार

कोल्हापूर / प्रतिनिधी : 

अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेमार्फत कागल तालुक्यातील मळगे खुर्द येथे डोळे तपासणी शिबीर पार पडले. अनंतशांती ही संस्था गेली पंधरा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट सेवाभावी संस्था म्हणून नावारुपाला आली आहे. गेली दोन वर्षे अनंतशांती सामाजिक सेवा संस्था आणि व्हिजन स्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांसाठी डोळे तपासणी शिबीर आयोजित करत आली आहे. 

या शिबीराचे संयोजन संस्थेच्या महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख तनुजा बाळकृष्ण गुरव यांनी केले होते. यावेळी गावातील 150 नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला अनंतशांतीच्या अध्यक्षा माधुरी खोत, संस्थापक भगवान गुरव, राधानगरी अध्यक्ष सुभाष चौगले, सदस्य जे. के. गोरंबेकर, रसुल शेख, किरण पाटील आणि गावातील सरपंच व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.