अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान

अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान

मुंबई प्रतिनिधी : प्रसिद्ध बॉलीवूड गायिका अलका याज्ञिक यांना अलीकडेच एक दुर्मिळ आजाराचं निदान झालं आहे ज्यामुळे त्यांचं ऐकू येणं थांबलं आहे. या समस्येची कारणं आणि परिणामांबद्दल त्यांनी स्वतः सांगितलं आहे की, सध्या त्यांना कोणताही  आवाज ऐकू येत नाही.

अलका यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हायरल अटॅकनंतर त्यांना हा त्रास झाला. एके दिवशी फ्लाइटमधून बाहेर पडताना त्यांना जाणवलं की आपल्याला काहीच ऐकू येत नाही. अलका यांनी या दुर्मिळ स्थितीबद्दल माहिती देताना चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजातील म्युझिकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.  अलका याज्ञिक, ज्यांनी ४० हून अधिक वर्षं संगीत क्षेत्रात व्यतीत केली आहेत, सध्या या आजारामुळे त्यांच्या गायनाच्या कारकिर्दीमध्ये काही अडचणी येत आहेत. 

त्यांच्या या समस्येमुळे चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांना मदतीचा आणि समर्थनाचा हात दिला आहे.