आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषद समोर छत्री मोर्चा

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषद समोर छत्री मोर्चा
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा

अशोक मासाळ / सांगली, प्रतिनिधी 


महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 70 हजार आशा स्वयंसेविका व 400 हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. या सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी आज सांगली जिल्हा परिषदेसमोर छत्री मोर्चा काढण्यात आला. 


आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना कामावर आधारित मोबदला मिळतो. पण तो अत्यंत कमी आहे. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाही. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याचे महत्त्वाचे काम करीत असून त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासनाच्या अनेक आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोलाचा वाटा आहे. प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक नेटाने सक्षमपणे कामे करतात. म्हणून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देवून त्यांना अनुषंनिक सर्व फायदे देण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका नेमणूक भारतीय संविधानाच्या ४७व्या कलनातील पुर्तता करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यांचे काम कायमस्वरूपी आहे म्हणून त्यांना मानसेवी, मानधनी स्वयंसेविका समजणे अयोग्य आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका पदे कायद्यानुसार निर्माण केलेली पदे आहेत म्हणून गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका शासनाच्या कर्मचारी असून केंद्र/राज्य सरकार व महानगरपालिका त्यांचे मालक आहेत व राष्ट्रीय आरोग्य अभियान ही आस्थापना आहे त्यांना मिळणाऱ्या मानधन आला मोबदला म्हणून संबोधणे योग्य नाही ते वेतन आहे म्हणून गटप्रवर्तकांना व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे देण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

यावेळी कॉ. रेहाना शेख, उमेश देशमुख, मिना कोळी, हणमंत कोळी, लता जाधव, सुरेखा जाधव, अंजुम नदाफ, शबाना आगा, वैशाली पवार, हेमा इम्मनावर, सुवर्णा सणगर, अलका पाटील,सिमा गायकवाड, मनिषा पाटील, राणी चव्हाण, उपस्थित होते.